गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. संपूर्ण भात शेती अवकाळी पावसामुळे पाण्यात वाहून गेली. भात शेतीचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे अरुण मुसळे आर्थिक विवंचनेत होते. त्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अरुण मुसळे यांनी नांदूरवैद्य गावच्या ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून कामाला होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांनी तालुका पिंजून काढला. अनेक कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. त्यानंतर पहिल्यांदाच 1997-98 पंचायत समितीची निवडणूक लढवली आणि मोठ्या मताधिक्क्याने ते साकूरमधून निवडून आले होते. शिवसेनेची एकहाती सत्ता आल्यामुळे अरुण मुसळे यांची इगतपुरी पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर सलग पाच वर्ष नांदूरवैद्य ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून ते राहिले होते. अरुण मुसळे यांच्या आत्महत्येमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.