शिवसेना एकच आहे. एकच राहील. दुसरी शिवसेना मी मानत नाही. गद्दारी करणाऱ्या शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण, सर्व बाजू तपासल्यास शिवसेनेला कोणताही धोका नाही. आम्ही सर्व गोष्टींची पूर्तता केल्याचे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकशाहीचं रक्षण करावं अशी निवडणूक आयोगाला विनंती असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. कारण पक्षांतर्गत घटनेचं पालन आम्ही पूर्ण केलं असल्याचे ते म्हणाले. शिंदे गटाला घटनाच नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने आधी निर्णय द्यावा. न्यायालयाच्या निर्णयाआधी निवडणूक आयोगाचा निर्णय नको असेही उद्धव ठाकरे म्हणाले. निवडणूक आयोगाने काय करावं? हे आम्ही सांगू शकत नसल्याचेही ते म्हणाले. शिवसेनेत मुख्य नेता हे पद घटनाबाह्य आहे. ज्या शिंदे गटानं शिवसेनेवर दावा सांगितला आहे, त्यांनी शिवसेनेची घटना आम्हाला मान्य नाही असे सांगितले आहे. विभागप्रमुख हे पद शहरापुरते मर्यादीत असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं, असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.