शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रेच्या प्रकरणावर १४ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

शनिवार, 21 जानेवारी 2023 (21:54 IST)
महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार असंवैधानिक आहे. या सरकारमधील शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रेच्या प्रकरणावर १४ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. या दिवशी १६ आमदार अपात्र ठरून सरकार कोसळेल, अशी भविष्यवाणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी शनिवारी केली.
 
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यासाठी ते अकोल्यात आले होते. यावेळी त्यांनी प्रचारमाध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्रात चाललेले शिंदे आणि फडणवीसांचे सरकारच असंवैधानिक आहे. सर्वोच्च न्यायालयात १६ आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. १४ फेब्रुवारीला त्यावर सुनावणी होईल. आम्हाला वाटते की त्या दिवशी निकाल लागेल. ते १६ आमदार अपात्र ठरतील. न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे, असे आ. पटोले म्हणाले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती