Shiv Sena : उच्चाधिकार मंत्रिगट नियुक्त माहिती शिवसेनेला नाही ,नवीन वाद

शनिवार, 10 जून 2017 (11:39 IST)
राज्यात होत असलेल्या शेतकरी संपावर तोडगा काढण्यासाठी  मुख्यमंत्र्यांनी  शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी  स्थापन केलेल्या मंत्रिगटाची आपल्याला कल्पनाच नसल्याचं शिवसेना नेते आणि  परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितल आहे.तर  मुख्यमंत्र्यांनी याबाबत आपल्याला अंधार ठेवल्याचं रावते म्हणाले. यामुळे आता पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे खरच शेतकरी संपावर तोडगा निघणार आहे की प्रश्न तसाच राहणार आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर  चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांकडून उच्चाधिकार मंत्रिगट नियुक्त

राज्यातील निरनिराळ्या शेतकरी संघटनांशी कर्जमाफीसह विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वात एका उच्चाधिकार मंत्रिगटाची नियुक्ती केली आहे.

राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते हे या उच्चाधिकार मंत्रिगटाचे सदस्य असतील. हा उच्चाधिकार मंत्रिगट सर्व शेतकरी नेत्यांशी चर्चा करेल आणि या सर्व मागण्यासंदर्भात आपला प्रस्ताव निर्णयार्थ शासनाकडे सादर करेल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

कोणतेही प्रश्न हे चर्चेतूनच सोडविले जात असतात आणि शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नावर शेतकरी नेत्यांशी चर्चा करण्याची शासनाची तयारी आहे, याचा पुनरूच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार केला आहे. त्यानुषंगाने या उच्चाधिकार मंत्रिगटाची नियुक्ती करण्यात येत आहे. शेतकरी नेत्यांनी सुद्धा चर्चेतून मार्ग काढावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

वेबदुनिया वर वाचा