वनमंत्री पदासाठी शिवसेना नगरसेवकाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

सोमवार, 15 मार्च 2021 (10:41 IST)
संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर राज्याच्या रिक्त झालेल्या वनमंत्री पद सध्या मुख्यमंत्री यांच्याकडे आहे. दरम्यान, एका शिवसेना नगरसेवकाने ‘मला वनमंत्री करा’ अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. रवी तरटे असे यांचे नाव असून संजय राठोड यांच्याच मतदारसंघातील दारव्हा नगरपरिषदेत ते नगरसेवक आहेत.
 
तरटे यांनी पत्रात लिहिले की, “5 वर्षांपासून मी शिवसेनेत निष्ठावंत म्हणून काम केले आहे. समाजकारणासह राजकारण या विषयावर चांगला दांडगा अभ्यास आहे. माझी मंत्रीमंडळात नियुक्ती केल्यास विदर्भाला मंत्रीमंडळात स्थान मिळेल. तसंच संजय राठोड यांच्याच मतदरासंघातील असल्याने त्यांचे मार्गदर्शनही मला लाभेल. इतर पक्षातील नेते या पदासाठी चढाओढ करत असून माझी शिवसैनिक म्हणून या पदावर निवड करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. पुढे पत्रात त्यांनी म्हटले की, “माझ्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन मला विधान परिषदेवर घेऊन वन खात्याचं मंत्रीपद द्यावं.”

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती