शिवसेनेने जो गट स्थापन केला, त्याचा उद्देश तोच आहे. या गटाची नोंद कोकण विभागीय आयुक्तांसमोर करावी लागते. या गटाचा व्हिप त्या गटाला लागू असतो. शिवसेनेने स्वत:चे 84 आणि अपक्ष 4 असे 88 जण एका गटाचे आहोत, असं या गटाद्वारे आयुक्तांना सांगितलं आहे. तर इकडे भाजपा कडून काय हालचाली करव्यात या साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थेट दिल्ली येथे गेले आहेत.