मातोश्री आणि ठाकरे कुटुंबाची सुरक्षा करण्यास शिवसैनिक खंबीर : विनायक राऊत

बुधवार, 21 जून 2023 (20:38 IST)
शिंदे-फडणवीस सरकारने ठाकरे कुटुंबियांची तसेच मातोश्रीवरील सुरक्षा कपात केली आहे.  यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे  पक्षाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. खासदार विनायक राऊत यांनी मातोश्री आणि ठाकरे कुटुंबाची सुरक्षा करण्यास शिवसैनिक खंबीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
विनायक राऊत म्हणाले की, आज मातोश्रीची सुरक्षा कपात सध्याच्या गद्दार सरकारने केली आहे. मात्र दुसरीकडे ठाणे शहर आणि ठाणे जिल्हात प्रत्येक गद्दाराला आणि पदाधिकाऱ्यांना शेकडोच्या संस्खेने सुरक्षा पुरवली आहे. मुख्यमंत्र्यांची सुरक्षा ठिक आहे, पण ठाण्यातील नगरसेवक आणि त्यांच्या पत्नी, पीएला आणि त्यांच्या कुटुंबांना सुरक्षा दिली जाते आणि भारताचं नाव उज्ज्वल करणाऱ्या मातोश्रीची सुरक्षा कपात केली जाते हा निदंनिय प्रकार आहे, असा हल्लाबोल विनायक राऊत यांनी शिंदे सरकारवर केला.
 
विनायक राऊत म्हणाले की, मातोश्रीच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकेर आणि रश्मी ठाकरेंपर्यंत या सगळ्यांच्या सुरक्षा त्यांनी काढल्या आहेत. सरकारचं कर्तव्य आहे की, ज्यांची लायकी नाही अशांना तुम्ही पोलीस संरक्षण देतात आणि उद्धव ठाकरे, मातोश्री यांना संरक्षण देण्याची आवश्यकता असताना त्यांचे संरक्षण काढता. या तुमच्या पोलीस संरक्षणामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यापुढे राहणार नाही. मातोश्री आणि ठाकरे कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी शिवसेना आणि शिवसैनिक ताकदीने खंबीर आहेत. आम्हाला यांची मेहरबानी नको, यांची भीक नको. पण त्यांना त्याच्या कर्तव्याचं पालन करावचं लागेल. कारण उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री आणि एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे भान विसरून किंबहूना मनामध्ये वाईट दृष्टीकोन ठेवून या मिंधे सरकारने त्यांची सुरक्षा काढली असेल, तर त्या ठाण्यामध्ये तुमच्या लुंग्या-सुंग्यांची सुरक्षा पहिली काढा, अशी मागणी विनायक राऊत यांनी केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती