आता कधीही मान्सून केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये दाखल होणार आहे. त्याचवेळी दुसरीकडे बिपरजॉय चक्रीवादळ आज त्याचे भीषण रूप दाखवणार आहे. हे चक्रीवादळ पुढच्या २४ तासांत अत्यंत तीव्र होणार आहे. यामुळे मुंबई, पालघर, कोकण किनारपट्टी अलर्ट जारी केला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ सध्या मुंबईपासून 630 किलोमीटरवर अंतरावर आहे.
बिपरजॉय चक्रीवादळामुळे कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि केरळच्या किनारी भागात जोरदार वारे वाहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच किनारपट्टीवर पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. IMD ने मच्छिमारांसाठी इशारा दिला आहे.
पाकिस्तानमधील कच्छ आणि लगतच्या गुजरातमध्ये पोहोचण्याची शक्यता
चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागामध्ये मोठ्या लाटा उसळतील तर मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदूर्ग या किनारपट्टीवरती वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
कोकणात मान्सूनची चिन्ह
मान्सूनची सर्वच जण चातकाप्रमाणे वाट पहातायत. कोकण किनारपट्टीवर मान्सून सक्रीय होण्याची चिन्ह दिसू लागली आहे. मान्सून महाराष्ट्रात कधी सक्रीय होणार याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त केला जातो. पण मान्सून सक्रीय कधी होणार? पाऊस कधी येणार? याचे अचूक ठोकताळे किनारपट्टीवरचा मच्छिमार सुद्धा बांधत असतात. सध्या कोकण किनारपट्टीवर निसर्ग बदललाय सुरवात झालीय आहे. त्यामुळे मान्सून सक्रीय होणार आहे.