शिरसाट म्हणाले, मातोश्रीवर काय आहे? तिथे उरलंय काय?

मंगळवार, 23 मे 2023 (21:29 IST)
शिवसेना फुटल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाने शिंदे गटाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. हे प्रकरण जवळपास १० महिन्यांहून अधिक काळ सुप्रीम कोर्टात होतं. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपाने मंत्रिमंडळाचा विस्तार केला नव्हता असं सांगितलं जातं. परंतु आता सुप्रीम कोर्टाने जुनं सरकार पुन्हा बसवता येणार नाही असं सांगितलं आहे. तसेच आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा विधानसभेच्या अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराची वाट आता मोकळी झाली आहे.
 
शिरसाट यांना प्रश्न विचारण्यात आला की, ज्या आमदारांना मंत्रीपद मिळणार नाही ते मातोश्रीकडे (ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान) परत जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे, त्याबद्दल काय सांगाल. या प्रश्नावर शिरसाट म्हणाले, मातोश्रीवर काय आहे? तिथे उरलंय काय? उलट तिकडे जे १५ आमदार आहेत ते शिंदे साहेब त्यांना बोलावण्याची वाट बघत आहेत. 
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती