साई संस्थानच्या सीईओंचे वादग्रस्त वक्तव्य

मंगळवार, 14 डिसेंबर 2021 (15:19 IST)
८ डिसेंबर रोजी साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी मुंबई येथे एका वृत्तपत्राने आयोजित केलेल्या खासगी कार्यक्रमात साई बाबांच्या जीवनाविषयी माहिती देताना बाबा एका विशिष्ट धर्माचे
असल्याचा उल्लेख केल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे.बानायत यांच्या वादग्रस्त वक्त्यव्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर साई भक्तांसह शिर्डी ग्रामस्थ आक्रमक झाले. यासंबंधी शिर्डी ग्रामस्थांनी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांची भेट घेतली. बानायत यांच्यासारख्या जबाबदार अधिकाऱ्याने अशा प्रकारचे वक्तव्य करून सर्व साई भक्तांच्या आणि शिर्डीकरांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी त्वरित माफी मागावी अन्यथा शिर्डी बंद ठेवण्याचा इशारा शिर्डी ग्रामस्थांनी या बैठकीत दिला.
 
साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी ग्रामस्थांच्या भावना जाणून घेत याबद्दलचा खुलासा करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी बानायत यांना केल्या. मला काही लोकांकडून चुकीची माहिती पुरवण्यात आली होती. त्या माहितीच्या
आधारेच माझ्याकडून अनावधानाने काही वक्तव्य केले गेले. मात्र त्यातून साई भक्तांच्या आणि शिर्डी ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या गेल्याने मी दिलगिरी व्यक्त करत असल्याची प्रतिक्रिया बानायत यांनी दिली. तर चुकीची माहिती पुरावणाऱ्यांची
चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी एका वृत्तपत्राच्या खासगी कार्यक्रमात बोलताना साई बाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने साई भक्तांसह
शिर्डी ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. बानायत यांनी याविषयी माफी मागावी अशी मागणी केली आहे.शिर्डीच्या साईबाबांनी श्रद्धा सबुरीसह सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला आहे. त्यामुळे साई दरबारी सर्व धर्मीय लोक आस्थेने दर्शनासाठी येत असतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती