शिर्डी : महत्वपूर्ण बैठक आज होणार, बेमुदत बंद तात्पुरता स्थगित

साईबाबा यांच्या जन्मस्थळाच्या वादावरुन शिर्डीकरांनी पुकारलेला बेमुदत बंद तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. शिर्डीच्या ग्रामस्थांकडून ग्रामसभेत याबाबत घोषणा करण्यात आली. त्यानुसार रविवार मध्यरात्रीपासून हा बंद मागे घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डी गावच्या शिष्टमंडळाला निमंत्रण देऊन याबाबत सोमवारी बैठक बोलावली आहे. त्यामुळे बेमुदत बंद तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आजच्या बैठकीत जर मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घेतला नाही तर पुन्हा एकदा आंदोलनाची दिशा ठरवली येईल, असा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला.
 
साई बाबांच्या जन्मस्थळाचा वाद आणि शिर्डीकरांनी पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती