रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये वाढ, शरद पवार यांचे मंत्र्यांना पत्र

मंगळवार, 18 मे 2021 (16:24 IST)
कोरोना संकट काळात रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी संबंधित खात्याचे केंद्रीयमंत्री सदानंद गौडा यांना खत दरवाढीच्या विरोधात पत्र लिहिले आहे.  
 
पेट्रोलच्या किमती शंभर पार असताना केंद्र सरकारने खतांच्या किंमती वाढवून सामान्यांना वेठीस धरल्याची टीका विरोधकाकडून होत आहे. एकीकडे कोरोना लॉकडाऊनमुळे शेतकरी संकटात असताना खतांच्या किंमतीत वाढ करुन शेतकऱ्यांना आणखी संकटात टाकण्याचं काम केंद्र सरकारने केलंय. त्यामुळे, विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य केलंय. आता, खुद्द शरद पवार यांनीही या दरवाढीची दखल घेत केमीकल आणि फर्टीलायजर मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहून शेतकऱ्यांची व्यथा मांडली आहे. तसेच, या दरवाढीकडे आपण गांभीर्याने पाहून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी विनंतीही केली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती