परीक्षा प्रक्रियेतील "अनियमितता आणि गैरप्रकार" बद्दल विरोधी पक्षाने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रॅस्टो यांनी शनिवारी एका निवेदनात दावा केला की, "आपले काम करण्यात अपयशी ठरून सरकार मुलांच्या जीवाशी आणि भविष्याशी खेळत आहे."
NEET आणि NET या स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेच्या वादात नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे (NTA) महासंचालक सुबोध सिंग यांना हटवल्याबद्दल प्रतिक्रिया देताना क्रास्टो म्हणाले की, प्रमुख त्यांच्या कर्तव्यात अपयशी ठरले आहेत. “त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा आणि आपल्या देशातील परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकार आणि गैरव्यवहारांची जबाबदारी स्वीकारावी.