Shapur: राज्यात काही ठिकाणी रस्त्यांचा अभाव आहे. काही गावात सुविधाच नाही. रस्ते नाही, वीज नाही, पाणी नाही, श्मशान नाही. खेडेगावातील अवस्था फारच दयनीय आहे. इथे लोकांना फार त्रास सहन करावा लागतो. शहापूर तालुक्यात अतिदुर्गम भागात पटकीचा पाडा या आदिवासी पाड्यात रस्त्याअभावी एका गरोदर महिलेला झोळीतून रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच तिची प्रसूती झाली. गावकर्यांनी अनेक वर्षांपासून या भागात रस्त्यांची मागणी केली असून प्रशासन या भागाकडे लक्ष देत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
रास्ता नसल्याने रुग्णांना रुग्णालयात नेत असताना दमछाक होते. इथल्या लोकांना अडचणीतून समोरी जावे लागते रविवारी सकाळी या गावातील एका गरोदर महिलेला प्रसव वेदना सुरु झाल्या तिला कसारा रुग्णालयात न्यायचे होते रस्ता नसल्यामुळे तिला कपड्याची झोळी करून त्यात घालून नेण्यात आले असता रस्त्यातच तिने बाळाला जन्म दिला त्या नंतर तिला आणि बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले