11 Maruti Temples समर्थांनी स्थापन केलेले 11 मारुती

मंगळवार, 23 एप्रिल 2024 (12:35 IST)
समर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रातील चाफळ आणि जवळच्या परिसरात सातारा, कराड, कोल्हापूर मध्ये 11 ठिकाणी मारुतीच्या मूर्त्यांना स्थापित केले. ही सर्व मारुती मंदिरे सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांच्या परिसरात आहेत. चला मग जाणून घेऊ या 11 मारुती बद्दल माहिती-
 
उंब्रज मारुती / मठातील मारुती
कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या उंब्रज येथे शके 1571 मध्ये स्थापिलेली मूर्ती आहे. अशी आख्यायिका आहे की समर्थ चाफळवरून उंब्रजला दररोज स्नानेसाठी येत असत. तेव्हा एकदा ते नदीत बुडताना त्यांना स्वयं हनुमंतानेच वाचविले होते. समर्थांना उंब्रज मधील काही जमीन बक्षीस म्हणून मिळाली होती. तिथे समर्थानी मारुतीच्या देऊळची स्थापना केली. चुना, वाळू आणि तागने निर्मित ही मारुतीची देखणी मूर्ती आहे. ह्या मूर्तीच्या पायाखाली दैत्य दिसतो.
 
चाफळ वीर मारुती / प्रताप मारुती / भीममारुती
सातारा कराड चिपळूणकडून जाणाऱ्या फाट्याजवळ उंब्रज गावाजवळ चाफळ येथे रामाच्या देऊळासामोरी हात जोडून उभा दास मारुती आणि त्याच देऊळाच्या मागे प्रताप मारुतीची कृष्ण नदीच्या काठावर चुना, वाळू, ताग पासून बनवलेलीही मूर्ती स्थापिली आहे. 6 फुटी ही उंच मूर्ती रामाच्या समोर हात जोडून उभारल्या या मूर्तीचे नैत्र श्रीरामाच्या चरणाकडे स्थिर असल्याचे जाणवते. चाफळच्या रामाच्या देऊळाच्या मागे रामदासांनी बांधलेले हे देऊळ आजतायगत आहे. या देऊळातली मारुतीची मूर्ती भीमरूपी स्तोत्रामध्ये वर्णन केल्या सारखीच आहे. कमरेला सोन्याची कासोटी, किणकिणत घंटा, नेटका, सडपातळ डोळ्यातून अग्निवर्षाव होताना जाणवणे. मूर्तीच्या पायाखाली दैत्य आहे. चाफळ येथे मारुतीच्या दोन मुर्त्यांची स्थापना रामदासांनी केली असून दोन्ही मूर्तींचे रूप वेगवेगळे आहे.
 
पारगाव मारुती
यालाच बाळमारुती किंवा समर्थांच्या झोळीतला मारुती असे म्हणतात. कराड- कोल्हापूर रस्त्यावर वाठार गाव जवळ नव्या पारगावाजवळ जुने पारगाव आहे त्यात ही मारुतीची मूर्ती आहे. सर्वात लहान अशी ही मूर्ती सपाट दगडवर कोरलेली दीड फुटीची मूर्ती आहे. शेंदूर नसून केसांची शेंडी बांधलेली दिसते. मारुतीराया जणू डावीकडे धावत निघाल्याचा आविर्भावात ही कोरलेली आहे. मनपाडळे ते पारगाव अंतर 5  किमी असून वळसा घेलेला रस्ता आहे.
 
माजगावचा मारुती
चाफळपासून 3 कि.मी. लांब एक गावात पाषाणाच्या रूपात असलेल्या दगडाला समर्थानी मारुतीचे रूप दिले. 5 फुटीची मूर्ती चाफळच्या राम मंदिराकडे तोंड करून उभारलेली आहे. आधीच्या कौलारू, माती विटाच्या देऊळाला जीर्णोद्धार करून नवे रूप देण्यात आले आहे. 
 
बत्तीस शिराळा मारुती
सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथे शके 1576 मध्ये समर्थांनी मूर्ति स्थापना केली. सांगली जिल्ह्यात नागांसाठी प्रसिद्ध असलेले हे गाव शिराळे याचा एसटी स्टॅन्डजवळ हे मारुतीचे देऊळ समर्थानी स्थापित केले आहे. हे देऊळ देखणे असून मारुतीची मूर्ती अतिशय भव्य आहे. 7 फुटी उंच ही मूर्ती चुन्याने बनवलेली आहे. ही मूर्ती उत्तराभिमुखी आहे. कटिवस्त्र आणि त्यातील गोंडा सुंदर असून कंबरपट्ट्यामध्ये घंटा बसविण्यात आला आहे. मूर्तीच्या डोक्याचा उजवी आणि डाव्या बाजूस झरोके आहे ज्यामधून सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी मूर्तीच्या तोंडावर प्रकाश पडतो. देऊळाच्या प्राकाराला दक्षिण दिशेस दार आहे. 
 
बहे बोरगाव मारुती
सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यात बहे गावा जवळ बोरगांवामुळे त्याला बेह बोरगाव म्हटले जाते. इथल्या मारुतीच्या स्थापनेच्या मागे एक आख्यायिका आहे. ती रामायणाशी संलग्न आहे. रावणाचा वध करून श्रीराम अयोध्येला परतांना इथे बोरगावास वास्तव्यास होते. कृष्णानदीला त्यावेळी वाळवंट होते. श्रीराम संध्यास्नान करत असताना कृष्णेला पूर येतं तेव्हा मारुतीने आपले दोन्ही बाहू अडवून नदीच्या प्रवाहाला धरून ठेवले. ते प्रवाह दोन्ही बाजूस विभक्त झाले. त्यामधून एक बेट तयार झाले आणि या क्षेत्राला बहे असे नाव मिळाले.
 
या जागी मारुतीचे समर्थांना मूर्तिरूपात दर्शन झाले नाही तेव्हा त्यांनी डोहात उडी मारून मारुतीची मूर्ती त्या डोहातून काढून स्थापित केली. मारुतीचे दोन्ही हात पाणी अडविण्याचा पावित्र्यात दिसून येतात डोक्यावर मुकुट हात दोन्ही मांड्यांचा बाजूला धरलेले. अशी ही भव्य मूर्ती दिसते. इथे जाण्यासाठी कृष्णानदीच्या वरील पुलाच्या पश्चिमेकडील बंधाऱ्यावरून बेटावरून जावे लागते. नदीस पूर आल्यास इथे जाणे शक्य नसते.
 
मनपाडळे मारुती 
मनपाडळे आणि पारगाव कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळगड -ज्योतिबाच्या परिसरात आहे. कोल्हापूर ते वडगाव वाठारपासून पुढे 14 किमीच्या अंतरावर हे मनपाडळे आहे. 11 मारुती पैकी सर्वात दक्षिणे दिशेस असलेल्या या मारुती देऊळाची स्थापना समर्थानी केली 5 फूट उंच असलेली ही साधी सुबक मूर्ती आणि देऊळ उत्तराभिमुखी आहे. मूर्ती जवळ दीडफुटी उंच कुबडी ठेवलेली आहे. जवळपास ओढ्या काठी सुंदरसे कौलारू देऊळ आहे. औरसचौरस असलेल्या गाभाऱ्याचे ह्या देऊळात नवीन बांधकाम केलेले सभामंडप देखील आहे.
 
मसूर मारुती
उंब्रजपासून 10 किमी असलेले मसूर येथे मारुतीची स्थापना केली आहे. 5 फुटीची चुन्यापासून बनवलेलीही पूर्वाभिमुखी असलेली मारुतीची मूर्ती अतिशय सौम्य प्रसन्न असलेली मूर्तीच्या मस्तकी मुकुट, गळ्यात माळ, जानवं, कमरेला मेखला, पायाखाली जंबुमाळी नावाचा राक्षस दिसतो. सहा दगडी खांब्यावर देऊळाचे छत तोलून धरले आहे. मूर्तीच्या एका बाजूस शिवराम आणि दुसऱ्या बाजूस समर्थांचे चित्र काढलेले आहे. या देऊळाचा सभामंडप 13 फूट लांबी रुंदीचा आहे. 
 
माजगाव
चाफळहून उंब्रज जाणाऱ्या रस्त्यावर सुमारे अडीच किमी दूर माजगांवी एका धोंड्यावर कोरलेली ही मूर्ती आहे.
 
शहापूरच्या मारुती 
कराड मसूर रस्त्यावर 15 किमी च्या अंतरावर मसूरपासून 3 किमी अंतरापासून शहापूरच्या फाट्याहून 1 किमी लांब हे मारुतीचे देऊळ आहे. 11 मारुती मधल्या मारुतीमध्ये सर्वात पहिले या मारुतीची स्थापना केली आहे. या मारुतीला चुन्याचा मारुती देखील म्हटले जाते. या गावाच्या एका टोकांवर नदीच्या काठाला मारुतीचे देऊळ आहे. देऊळ आणि मारुतीची मूर्ती दोन्ही पूर्वाभिमुखी आहे. 7 फुटाची ही मूर्ती काहीशी उग्र दिसते. या मूर्तीच्या पुढील पितळी उत्सव मूर्ती आहे. मारुतीच्या मूर्तीच्या मस्तकी गोंड्यांची टोपी आहे. येथून जवळच रांजण खिंड आहे. येथून 2 दगडी रांजण दिसतात ह्याचा जवळच्या टेकडीवर समर्थांचे वास्तव्य असतं.
 
शिंगणवाडी मारुती / खडीचा मारुती / बालमारुती 
याला चाफळचा तिसरा मारुती देखील म्हणतात. शिंगणवाडीची टेकडी चाफळ पासून 1 किमती च्या अंतरावर आहे. येथे रामघळ समर्थांच्या ध्यानाचे छोटेशे स्थळ आहे. येथे समर्थानी मारुतीची छोटीशी सुबक मूर्तीची स्थापना केली. 4 फुटी उंचीची उत्तरेकडे तोंड केलेली ही मूर्ती जिच्या डाव्या हातात ध्वजासारखी वस्तू दिसण्यात येते. सर्व 11 मारुतीच्या देऊळात हे सर्वात लहान देऊळ आहे. आजूबाजूच्या परिसरात घनदाट झाडे आहे. या देऊळाचा कळस तांबड्या रंगाने रंगविला आहे.

सातारा जिल्ह्यातील मारुती : उंब्रज, चाफळचा वीर मारुती आणि प्रताप मारुती, शिंगणवाडी, मसूर, माजगाव, शहापूर.
सांगली जिल्ह्यातील मारुती : बत्तीस शिराळा, बहे बोरगाव.
कोल्हापूर जिल्ह्यातील मारुती : मनपाडळे, पारगाव.
 
समर्थ रामदास स्वामींनी 11 मारुतीचे दर्शन घेण्यासाठी कोणत्याही दर्शनाची क्रमवारीचे बंधन घातलेले नाही अशात आपण एका किंवा दोन दिवसांत या 11 मारुतीचे दर्शन घेऊ शकता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती