थेरगावमध्ये तृतीयपंथीयावर लैंगिक अत्याचार; सात जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल

मंगळवार, 1 जून 2021 (16:23 IST)
पिंपरी |तृतीयपंथीयावर लैंगिक अत्याचार करीत मारहाण करून ऐवज लुटल्याची घटना थेरगाव येथे घडली आहे. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात सात जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
 
याप्रकरणी एका तृतीय पंथी व्यक्तीने फिर्याद दिली आहे. रुक्सार उर्फ इरफान इन्साफ खान, आजम शेख (दोघेही रा. गोवंडी इस्ट, मुबई), अनम (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही), सिमरन उर्फ पवन (पूर्ण नाव माहीत नाही, रा. गोवंडी इस्ट, मुंबई) व तीन अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
आराेपी आजम शेख हा आरोपी रुक्सार खान हिचा पती आहे. तसेच रुक्सार खानसह इतर आरोपी व फिर्यादी हे तृतीय पंथी आहेत. एकमेकांचे गट सोडून आल्याने त्यांच्यात वाद आहे. आरोपी रुक्सार खान ही फिर्यादीची पूर्वीची गुरू आहे. आरोपींनी फिर्यादी व तिच्या मैत्रिणीला चाॅपर उलटा मारून जखमी केले. तसेच फिर्यादी व तिच्या मैत्रिणीकडील मोबाईल तसेच फिर्यादीकडील तीस हजारांची रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. तसेच आरोपी आजम याने फिर्यादीच्या मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती