शिंदे गटात जाणाऱ्या शिवसेनेच्या संभाव्य खासदारांना सुरक्षा कवच देण्यात आले आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आणि रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्या घर आणि कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणाऱ्या संभाव्य खासदारांना सुरक्षा पुरवण्यात येत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राहुल शेवाळे, भावना गवळी, कृपाल तुमने, हेमंत गोडसे, सदाशिव लोखंडे, प्रतापराव जाधव, धर्यशिल माने, श्रीकांत शिंदे, हेमंत पाटील, राजेंद्र गावित, संजय मंडलिक, श्रीरंग बारणे हे खासदार शिंदे गटात सहभागी होणार असल्याच्या दाट शक्यता आहेत.