परदेशातील लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर कोरोनाची बाधा होत असल्याची माहिती पेडियाट्रिक टास्क फोर्सने दिल्यानंतर अशात शाळा उघडल्या तर अडचण होऊ शकते, अशी प्रतिक्रिया सर्व तज्ञ डॉक्टरांनी दिल्यावर तूर्तास हे लांबणीवर गेले आहे.
"ज्या जिल्ह्यात किंवा शहरात रुग्ण संख्या कमी झाली आहे, किंवा पूर्णपणे नाहीशी झाली आहे, अशा जिल्ह्यात शाळा सुरू करण्याचे नियोजन करता येईल." असं सीतराम कुंटे यांनी स्पष्ट केलं. 17 तारेखेपासून शाळा सुरु करण्याचे आदेशावर पद्धतीने सुधारणा करता येईल व निर्णय घतेला जाईल.
मुलांचे लसीकरण न झाल्याने सध्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरु करण्यास टास्क फोर्सने विरोध केल्यामुळे शाळा बंदच राहण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री बैठक घेऊन याबाबत अंतिम निर्णय घेतील असं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हटलं.