पब्लिक सब जानती है असे म्हणत भुजबळ यांचा राणेंना टोला

शनिवार, 19 फेब्रुवारी 2022 (15:24 IST)
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आरोपाला उत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले की, आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. आनंदाचे वातावरण आहे. आज पत्रकार परिषद झाली नसती, तर बरं झालं असतं. मात्र, असो. मातोश्रीवरच्या आरोपांच्या संबंधाने भुजबळ म्हणाले की, तशी परिस्थिती नाही. त्यांचे आणि माझे सीए वेगळे आहेत. त्यांच्या सीएचा आमच्या सीएशी संबंध नाही. आजकाल कारवाई करताना मटेरिअल महत्वाचे नाही. दिल्लीवरून आदेश आला की, नसलं तरी कारवाई होते. काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक आपल्या पार्टीत येणार म्हटल्यावर, इनको छोड दो असा उलटा संदेश येतो, असा दावा त्यांनी केला.
 
छगन भुजबळ पुढे म्हणाले की, एक दोन माणसं अख्ख्या राज्यात आरोप करत फिरत होते. त्याला संजय राऊत यांनी कणखर उत्तर दिलं. काँग्रेस सोडून काही लोक भाजपात का गेले, हे सगळ्यांना माहिती आहे. पब्लिक सब जानती है, असा टोलाही त्यांनी यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता हाणला.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती