सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आशिया खंडात १०९ व्या स्थानावर

शनिवार, 4 मे 2019 (10:08 IST)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संपूर्ण आशिया खंडात १०९ व्या स्थानावर आहे. ‘टाइम्स हायर एज्युकेशन रँकिंग’च्या आशिया खंडातील विद्यापीठांची गुणांकने जाहीर झाली आहेत. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी विद्यापीठ याच गुणांकनात १८८ व्या स्थानावर होते.
 
याच गुणांकनानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे भारतातील सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये सामाईकपणे सहाव्या स्थानावर आहे. पहिल्या क्रमांकावर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस (बंगळुरू), दुसऱ्या क्रमांकावर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंदूर), तिसऱ्या क्रमांकावर संयुक्तपणे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (मुंबई), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (रूरकी) आणि जेएसएस अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रीसर्च (मैसूर) या संस्था आहेत

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती