सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदवीदान सोहळ्यात काळा घोळदार गाऊन आणि टोपी या ‘कॉन्व्होकेशन ड्रेस’ची जागा नवीन पोशाखाने घेतली. यावेळी कुडता, पायजमा,उपरणे आणि पगडी असा पोशाख होता. या समारंभाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खेचराला पुणेरी पगडी घालून विद्यापीठात आणले. पुणेरी पगडी नको फुले पगडी हवी, अशी मागणी त्यांनी केली.