सटाणा – कार विहिरीत पडल्याने चार जणांचा मृत्यू, तर एक जण सुखरुप बचावले

शनिवार, 8 मे 2021 (12:04 IST)
लग्‍नासाठी कारने जात असतांना साक्री तालुक्यातील पिंपळनेर जवळील दिघावे फाट्या जवळ असलेल्या विहिरी कार पडल्याने चार जणांचा दुर्दैवी मृत्‍यू  झाला. तर तर एक जण सुखरुप बचावले. सटाणा येथील रहिवाशी शंकर यादवराव बोडखे हे स्वमालकीच्या कार (क्र. एमएच ०२, १७४०) मधून जात असतांना हा अपघात झाला. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार दिघावे फाट्यावरील कासारेचे शेतमालक मिलिंद जयवंतराव देसले यांच्या विहिरीत पडली.
 
या अपघातात कार चालवत असणारे शंकर बोडखे (रा. सटाणा) हे कारमधून सुखरूप बाहेर पडले. परंतु त्यांची पत्नी गौरी बोडखे, (वय ३५), मुलगी श्रद्धा (वय १५), मुलगा तन्मय (वय १२) व दिघावे येथील नात्‍यातील युवती भूमिका योगेश पानपाटील (वय १२) हे पाण्यातच मृत झाले. कार चालवत असलेले शंकर बोडखे घडलेल्‍या प्रसंगाने इतके घाबरले होते, की त्यांना एक तास काहीच सुचले नाही, एका ठिकाणी बसून केवळ ते पाहत राहिले.
 
 मदतकार्यासाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध करत अवघ्‍या काही वेळातच मदतकार्य केल्यामुळे शंकर बोरसे यांना वाचविण्यात यश आले. इतर कुटुंबीय मात्र मृत झाले. साक्री पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने विहिरीतून तरुणांच्या मदतीने कार बाहेर काढली. सटाणा शहरात शंकर बोडेखे यांचे वेल्डींग वर्कशॅाप आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती