दारु पिऊन भांडणे करतो, पैशावरून वाद घालतो म्हणून भावाने आपल्या सख्ख्या भावाचा खून केला. ही घटना मोशी येथे घडली. मनोज ज्ञानेश्वर बोऱ्हाडे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. यशवंत गुलाब केंजळे (वय 51, रा. संगमवाडी, खडकी, पुणे) यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अक्षय ज्ञानेश्वर बोऱ्हाडे (वय 22, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) असे खूनाचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपी भावाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मनोज हा नेहमी दारु पिऊन घरी येत असे. घरातील व्यक्तींशी भांडण करीत असे. तसेच पैशावरून वाद घालत असे. वारंवारच्या भांडणाला बोऱ्हाडे कुटुंबिय कंटाळले होते. गुरुवारी दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास मनोज याने घरी भांडण सुरू केले.