संजय राऊतांच्या वक्तव्यानुसार येत्या 15 दिवसात शिंदे -फडणवीस सरकारचे डेथ वारंट निघाले असून हे सरकार कोसळणार. संजय राऊतांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक जण आपापली मते मांडत आहे.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 40 लोकांचं राज्य कोसळणार आहे.या सरकारचे डेथ वारंट निघाले असून येत्या 15 दिवसात हे राज्य कोसळणार असे भाकीत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
संध्याकाळी 6.30 वाजता ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पाचोरा येथे जाहीर सभा होणार असून ठाकरे दुपारी 11 वाजता मुंबई येथून जळगावकडे खाजगी विमानाने प्रवास करतील नंतर वाहनाने पाचोरा पोहोचतील. ते आज उद्योजकांशी चर्चा करतील. तसेच निर्मल सिड्स येथील भारतातील प्रथम अत्याधुनिक लॅबचे उद्घाटन करतीलशिवसेनेचे माजी आमदार आणि निर्मल सिड्सचे चेअरमन आर ओ पाटील यांचा 11 फूट उंच पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करतील नंतर संध्याकाळी 6:30