संजय राऊत हे सपत्नीक राज यांच्या नव्या घरी शिवतीर्थला भेटीसाठी गेले होते. सुमारे अर्धा तास ही भेट झाली. मुलीच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी. राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी राऊत राज यांच्या घरी गेले होते. या खासगी भेटीनंतर राऊत राज यांच्या घराबाहेर पडले तेव्हा राज आणि शर्मिला ठाकरे हे त्यांना अगदी गाडीपर्यंत सोडण्यासाठी आले होते.