सोमवारी मानसिक आरोग्य दिनी मोहिमेची सुरुवात झाली असून आता माध्यमिक शिक्षण विभाग व इस्लामपुरातील सुश्रूषा संस्थेतर्फे ७६६ माध्यमिक शाळांत मोबाईलविषयक सर्वेक्षण केले जाणार आहे. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन मानसशास्त्रीय मापन केले जाणार आहे. यातून मोबाईलच्या व्यसनात अडकलेल्या मुलांची निश्चित संख्या व व्यसनाचे गांभीर्य स्पष्ट होणार आहे.
मोबाईलमुक्तीसाठी तज्ज्ञांमार्फत समुपदेशन केले जाईल. शिक्षक प्रशिक्षण, पालकांचे प्रबोधन, जनजागृती आदी उपक्रम वर्षभर राबविले जातील. माध्यमिक शिक्षणाधिकारी सुभाष चाैगुले यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेत उपशिक्षणाधिकारी गणेश भांबुरे, माधुरी गुरव, पोपट मलगुंडे, कक्ष अधिकारी उल्हास भांगे, मानसतज्ज्ञ क्रांती गोंधळी, तेजस्विनी पाटील, सूरज कदम, प्रियांका सरतापे, वसुंधरा पाटील, कालिदास पाटील यांचा सहभाग असेल.
- अभ्यासाव्यतिरिक्त होणारा वापर
- कार्टून, मनोरंजन, संशोधन व आक्षेपार्ह माहितीसाठी वापर
८५ टक्के मुलांमध्ये चिडचिडेपणा -
कालिदास पाटील यांच्या सुश्रुषा संस्थेने जिल्ह्यातील १५ वर्षांपर्यतच्या ८ हजार ८९२ मुला-मुलींचे मोबाईलच्या दृष्टीने मानसशास्त्रीय सर्वेक्षण केले. त्यातून ८५ टक्के मुलांत चिडचिडेपणा, ५७ टक्के मुलांमध्ये टोकाचा संताप, ५२ टक्के मुलांमध्ये भुकेच्या तक्रारी तर ५१ टक्के मुलांमध्ये अतिचंचलता आढळली.