सांगली, मिरज रेल्वे स्टेशनला बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलीस यंत्रणाची शोधमोहीम सुरु

मंगळवार, 14 मे 2024 (12:18 IST)
महाराष्ट्रातील सांगलीमध्ये अज्ञाताने दूरध्वनीवरुन सांगली मिरज रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याने पोलीसांनी रात्रभर सांगली व मिरज स्थानकावर शोध मोहीम राबवली. तसेच कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. 
 
फोनवरुन सांगण्यात आले की, आरडीएक्सने रेल्वे स्टेशन व परिसरात बॉम्ब स्फोट घडविण्यात येणार असून ते पाच व्यक्ती आहे. व ताबडतोब पोलिसांनी गर्दीच्या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला. तसेच सांगली पोलीस स्टेशनमध्ये या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला गेला आहे. 
 
पोलीस स्टेशनच्या दुरध्वनी वर सोमवारी रात्री एका अनोळखी व्यक्तीने फोन केला व आरडीएक्सने ते रेल्वे स्टेशन परिसरात बॉम्ब ठेवुन रेल्वे स्टेशन बॉम्बने उडविणार असुन पाच व्यक्ती आहे अशी माहिती दिली. तसेच इतर जिल्यांमध्ये देखील माणसे पोहचली असून तिथे देखील बाँम्ब स्फोट घडवणार आहे असे सांगितले. याबाबत तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. तसेच ही बाब अतिशय गंभीर असून पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रेल्वेस्टेशन परिसरात तपासणी करण्यात आली.  
तसेच नाकाबंदी करून वाहनांची तपासणी देखील केली गेली. 
 
तसेच शहरात अग्निशामक यंत्रणा आणि रुग्णवाहिका यांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले. खाजगी आणि सरकारी रुग्णालयांना देखील सज्ज राहण्यास सांगितले. पण रेल्वे स्टेशनवर तपासणी केली असता कुठेही काहीही संशय येईल असे आढळले नाही. शोध मोहीम सुरु असतांना रेल्वे पोलीस पथक पोलीस अधिकारी व अंमलदार हे व इतर अधिकरी देखील हजर होते. धमकी देणाऱ्या या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून हा फोने कोणी केला याचा शोध सुरु करण्यात आला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती