मुंबई : ज्या होर्डिंगने आता पर्यंत 14 लोकांचा घेतला जीव, ती होर्डिंग विना परवानगी लावण्यात आली

मंगळवार, 14 मे 2024 (10:48 IST)
मुंबई मधील घाटकोपर मध्ये सोमवारी मोठा अपघात झाला आहे. इथे एका पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळल्यामुळे 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 70 लोक जखमी झाले आहे.  
 
मुंबईमधील घाटकोपर परिसरात वादळ वाऱ्यामुळे एक भली मोठी होर्डिंग कोसळली. पेट्रोल पंपावर स्थित ही होर्डिंग कोसळली तेव्हा तिथे अनेक लोक उपस्थित होते. या होर्डिंग खाली 70 जण जखमी झाले तर 14 लोकांचा दाबल्या गेल्यामुळे मृत्यू झाला आहे. 
 
जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. व उपचार दरम्यान 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. बृहमुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगरानी म्हणाले की, ही होर्डिंग अवैध होती. ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथे रेल्वेच्या जमिनीवर चार होर्डिंग लावण्यात आले होते. विना परवानगी ही होर्डिंग लावण्यात आली होती. ही होर्डिंग खूप मोठी होती व ती अचानक वादळ वाऱ्यामुळे कोसळल्याने एकच हाहाकार झाला आहे.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती