रायगड किल्ल्यावरील विद्युत रोषणाईवरुन संभाजीराजे यांनी पुरात्तव विभागाला खडसावले

शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (16:00 IST)
रायगड किल्ल्यावरही पुरातत्व खात्याने विद्युत रोषणाई केली आहे. परंतु या विद्युत रोषणाईवरुन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुरात्तव विभागाला चांगलेच खडसावले आहे. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सभोवताली रंगीबेरंगी विद्युत दिव्यांची रोषणाई करण्यात आल्याने खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विद्युत रोषणाईवरुन पुरातत्व खात्यासाठी हा काळा दिवस असल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.
 
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिवजयंतीपूर्वीच पुरातत्व विभागाला खडसावले आहे त्यामुळे कारवाई होण्याची शक्यता आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करत रायगडावर केलेल्या विद्युत रोषणाईवर नाराजी व्यक्त केल आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने रायगड किल्ल्यावर जी प्रकाशयोजना केली आहे, ती अतिशय विचित्र स्वरूपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल.
 
त्यांचे अधिकारी महान ऐतिहासिक स्थळांच्या प्रती इतके असंवेदनशील झाले आहेत की, रंगबेरंगी प्रकाश योजना वापरुन हे पवित्र स्मारक डिस्कोथेक सारखे दिसत आहे. एक शिवभक्त म्हणून मी मनातून दु:खी झालो असून या प्रकारचा मी तीव्र निषेध करतो. अशा शब्दांत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती