मनसेच्या ट्विटचे आणि अमित ठाकरेंच्या भूमिकेचे रोहित पवारांकडून स्वागत

मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020 (16:49 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी मनसे नेते आणि राजपुत्र अमित ठाकरेंचं कौतुक केले आहे. सरकारच्या चांगल्या कामाला दिलसे पाठिंबा देणारे आपल्यासारख्या नेतेही विरोधी पक्षात आहेत, हे पाहून आनंद वाटल्याचे रोहित पवार यांनी म्हटलंय. आरेमधील कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयास मनसेनं पाठिंबा दर्शवला आहे.   
 
आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याच्या निर्णयास विरोधी पक्षानं कडाडून विरोध करण्यात आला.  मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी सरकारच्या या निर्णयाला पाठिंबा दिला असून राष्ट्रवादीने त्यांच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. मेट्रो कारशेड आरेमधून हटविल्यामुळे आर्थिक नुकसान होईल असे आरोप होत आहेत? अमित ठाकरेंना काय वाटतं, या प्रश्नावर अमित ठाकरेंनी उत्तर दिलंय. 
 
मुंबईचं आणि भावी पिढीसाठी गरजेचं असलेल्या पर्यावरणाचं नुकसान होण्यापेक्षा कारशेडचं नुकसान झालेलं परवडेल, असं अमित ठाकरेंनी म्हटलं आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. तसेच, अमित ठाकरे हेही पर्यावरणप्रेमी असल्याचं या ट्विटवरुन सांगण्यात आलंय. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती