बारावीच्या परीक्षेसाठी जामीनवर जेल बाहेर पडला आणि केला खून

गुरूवार, 24 मार्च 2022 (13:04 IST)
सांगली : सांगलीतील रोहन नाईक हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 12वी ची परीक्षा देण्याच्या बहाण्याने आरोपी जामिनावर बाहेर आला होता. आणि दरम्यान त्याने खून केल्याचं उघडकीस आलं आहे. 
 
मंगळवारी संध्याकाळी सांगली स्टॅंडकडे जाणाऱ्या रोडवर रोहन नाईकचा खून झाला होता. या हत्या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. संबंधित आरोपी कारागृहात होता आणि बारावीची परीक्षा देण्याच्या निमित्ताने जामिनावर जेलबाहेर आला होता.
 
माहितीनुसार एसटी स्टँड रोडवर अज्ञात हल्लेखोरांकडून रोहन नाईक या तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते तसेच हल्लेखोरांनी रोहनवर दगडानेही हल्ला केला होता. या हल्यात रोहनचा जागीच मृत्यू झाला.
 
रोहन पेटिंगचे काम करत होता. मंगळवारी रंगपंचमी असल्याने त्याने कामातून सुटी घेतली होती आणि दुपारी तो मित्रांसोबत रंगपंचमी खेळत असताना एका तरुणाच्या अंगावर रंग पडल्याने संशयित आणि त्याच्यात वाद झाला होता. वादावादी वाढल्याने दोन्ही गट समोर आले होते मात्र वाद तेव्हा मिटवण्यात आला होता.
 
मंगळवारी सांयकाळी एका बारमध्ये पुन्हा एकदा हे दोन्ही गट समोरासमोर आले आण पुन्हा वाद घडला. नंतर मृत रोहन आपल्या मित्रांसह तिथून बाहेर आला व सिव्हिल चौकाकडे येत असताना संशयितांनी त्याचा पाठलाग करत तो पळून जात असताना एकाने धारदार हत्याराने त्याच्या पाठीत वार केला. यावेळी तो कोसळून जागीच ठार झाला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती