कोल्हापूर शहरात दोन दिवस पाणी नाही पुरवठा बंद राहणारा परिसर पुढीलप्रमाणे

गुरूवार, 24 मार्च 2022 (08:58 IST)
बालिंगा उपसा केंद्राकडील पंपाची डिलीव्हरी लाईन मेन रायझिंग लाईनला जोडण्याचे काम करण्यात येणार आहे. यामुळे बालिंगा व नागदेववाडी उपसा केंद्राकडील पाणी उपसा बंद राहणार असल्याने गुरूवारी (दि.23) शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवारी (दि. 24) अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेचे जल अभियंता अजय साळुंखे यांनी दिली आहे.
 
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून बालिंगा उपसा केंद्रात 300 एचपी व्हर्टीकल टर्बाईन बसवण्यात आले आहे. येथील पंपाची डिलीव्हरी लाईन मेन रायझिंग लाईनला जोडण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात दोन दिवस पाणीबाणी असणार आहे.
 
पाणीपुरवठा बंद राहणारा परिसर
 
लक्षतीर्थ वसाहत परिसर, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड परिसर, सानेगुरूजी वसाहत परिसर, राजेसंभाजी परिसर, क्रशरचौक परिसर आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर परिसर, कणेरकरनगर परिसर, क्रांतीसिंहनाना पाटील नगर परिसर, तुळजाभवानी कॉलनी परिसर, देवकर पाणंद परिसर, टेंभे रोड परिसर, शिवाजीपेठ परिसर, चंद्रेश्वरगल्ली परिसर, तटाकडील तालीम परिसर, साकोली कॉर्नर परिसर, उभा मारुती चौक परिसर, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाव्दार रोड परिसर, मंगळवार पेठ, गंगावेश परिसर, उत्तरेश्वरपेठ परिसर, शुक्रवार पेठ परिसर, ब्रम्हपुरी परिसर, बुधवारपेठ तालिम परिसर, सिध्दार्थनगर परिसर, पापाची तिकटी परिसर, लक्ष्मीपुरी परिसर, शनिवारपेठ चौक परिसर, सोमवारपेठ परिसर, ट्रेझरी ऑफीस परिसर, बिंदुचौक परिसर, कॉमर्स कॉलेज परिसर, आझाद चौक परिसर, उमा टॉकीज परिसर, महालक्ष्मी मंदीर परिसर, गुजरी परिसर, मिरजकर तिकटी परिसर, देवलक्लब परिसर, खानविलकर पेट्रोलपंप परिसर, शाहुपूरी 5, 6, 7 व 8 वी गल्ली, कुंभार गल्ली व बागल चौक

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती