या प्रकरणी ज्ञानेश्वर काशीनाथ निमोने, गौरव काशीनाव निमोने, सौरव काशीनाथ निमोने, काशीनाथ येडू निमोने, शशिकला काशीनाथ निमोने व जावई मनोज दानवेसह अन्य आरोपींवर सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या 15 -20 दिवसांपूर्वी मंडळाने पुन्हा त्यांच्या जमिनीवर ढोल आणून ठेवले यावरून पाडसवान कुटुंब आणि मंडळाच्या अध्यक्षांमध्ये वाद झाला. पाडसवान कुटुंबीयांनी जमिनीवर बांधकाम काढले असून त्याचे साहित्य देखील प्लॉटवर ठेवले होते. बांधकाम साहित्य बाजू करून गणोशोत्सवाचे कार्यक्रम करण्याचे गणेश मंडळ अध्यक्ष निमोने दाब टाकायचे.
यावरून पाडसवान कुटुंब आणि निमोने यांच्या जोरदार वाद झाला आणि रागाच्या भरात निमोने कुटुंबाचे राजकीय संबंध आणि वादावरून पाडसवान कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात प्रमोद पाडसवान यांचा मृत्यू झाला तर त्यांचे वडील आणि मुलगा जखमी झाले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.