छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातील चिंचवडगाव शिवारात प्रसिद्ध महिला कीर्तनकार ह.भ.प संगीताताई महाराज पवार(44) यांच्या आश्रमात शिरून अज्ञात हल्लेखोऱ्याने दगडाने डोकं ठेचून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.हत्याचे कारण अद्याप कळू शकले नाही.