ते लुटायचे प्रवासी नागरिकांना रिक्षात सोबत बसायचे प्रवासी म्हणून

लुट मार करणारे कसे तुटतील याचा भरोसा नाही. सोबत दिसणारे प्रवासी नंतर लुटारू निघाले तर असाच प्रकार जळगाव येथे घडला आहे. 
 
रेल्वेस्थानकाजवळ एखाद्या प्रवाशाला रिक्षात बसून त्याच्याकडून चाकू दाखवत रोक रक्कम व ऐवजांची जबरीलूट करणारे रिक्षासह तिघांना ताब्यात घेण्यात शहर पोलीसांना यश आले असून यातील एक आरोपी फरार आहे. दरम्यान हे अट्टल गुन्हेगार असून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी आणि लूट केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी शहर पोलीसात चौघांविरोधात घरफोडी आणि जबरीलुटप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
 
सामाजिक कार्यकर्ता तसेच आरटीओचे एजंट आयुब खान राजे खान (वय 49) रा. नुराणी नगर पाचोरा हे रमजानईद निमित्त पाचोरा येथून जळगावाती फुले मार्केटमध्ये सामान खरेदी करण्यासाठी आले होते. रेल्वे स्टेशनला आल्यानंतर टॉवर चौकात रिक्षात बसले. यावेळी या रिक्षात आरोपी तझींम बेग नसीम बेग मिर्झा उर्फ सुल्‍तान मिर्झा (वय- 26) रा. बिलाल चौक तांबापुरा, मोसीन खान नूरखान ऊर्फ शेंबड्या (वय- 25) रा. गेंदालाल मिल ह.मु. पिंप्राळा हुडको, रिक्षाचालक शोयब शेख युसुफ (वय-19) रा.शाहूनगर आणि गुड्डू उर्फ नईम बिस्ती रा. पिंप्राळा बसलेले होते.यावेळी या रिक्षात आरोपी तझींम बेग नसीम बेग मिर्झा उर्फ सुल्‍तान मिर्झा (वय- 26) रा. बिलाल चौक तांबापुरा, मोसीन खान नूरखान ऊर्फ शेंबड्या (वय- 25) रा. गेंदालाल मिल ह.मु. पिंप्राळा हुडको, रिक्षाचालक शोयब शेख युसुफ (वय-19) रा.शाहूनगर आणि गुड्डू उर्फ नईम बिस्ती रा. पिंप्राळा बसलेले होते. रिक्षा सरस्वती डेअरी चौकात आल्यानंतर आयुब खान यांना त्यांच्या काही हालचाली लक्षात आल्या. मात्र त्यांनी काही करण्याआगोदरच चौघांनी दमबाजी करत व चाकूचा धाक दाखवत त्यांच्याजवळील 13 हजार 400 रुपये सोबत त्यांचे आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स काढून त्यांना रस्त्यावर उतरून चौघेजण फरार झाले.
 
एएसआय वासुदेव सोनवणे व प्रीतम पाटील यांनी लागलीच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील नेत्रण सीसीटीव्ही कक्षातून घटनास्थळातील चौकात लावलेले सीसीटीव्हीच्या आधारे तपासणी केली असता त्यात रिक्षा क्रमांक एमएच 19 जे 6370 असल्याचे निष्पन्न झाले. सापळा रचून रिक्षासह तिघांना अटक, एक फरार शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आर.ए. सोनवणे यांना माहिती दिल्यानंतर एक पथक तयार केले. त्या पथकात पीएसआय वासुदेव सोनवणे, विजय पाटील, प्रीतम पाटील, संजय शेलार, भरतसिंग पाटील, सुनील पाटील, गणेश शिरसाळ, प्रणेश ठाकूर, रतन गीते, संजय भालेराव, दीपक सोनवणे, नवजित चौधरी, गणेश पाटील, तेजस मराठे आदींचे पथक रवाना झाले. क्षा क्रमांक (एमएच 19 जे 6370) ही शाहूनगर मधील शेख युसुफ यांची असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिस पथक शाहूनगर जाऊन मोठ्या शिताफीने तिघांना जणांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली. यातील आरोपी गुड्ड्या उर्फ नईम बिस्ती हा फरार झाला. दरम्यान चौघांनी ह्याच रिक्षातून शहरातील एम.जे. कॉलेज, आयटीआय परिसर, भास्कर मार्केट, नवीन बसस्थानक, सुभाष चौक, अजिंठा चौफुली, कालिंका माता चौफुली, रिंग रोड, रेमंड चौक अशा भागात दबा ठेवून प्रवाश्यांना हेरण्याचे काम जबरी लूट आणि घरफोडी केल्याची कबुली दिली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती