या तर अफवा आहेत : सुप्रिया सुळे

'राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण या अफवा आहेत. आमची अशी कोणतीही चर्चा झाली नाही. ही चर्चा फक्त मीडियामध्ये आहे,' असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणाबाबतच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि राहुल गांधी यांची भेट चर्चेत आली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
 
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला असून विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक संख्याबळापर्यंत पोहचण्यात काँग्रेसला दुसऱ्यांदा अपयश आले आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी ५५ जागा जिंकणे आवश्यक आहे. तर काँग्रेसला केवळ ५२ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे काँग्रेसला विरोधीपक्ष नेतेपद मिळणे अशक्य आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन केल्यास विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याएवढ्या जागा होऊ शकतील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती