आणि संजय राऊतांनी केली सारवासारव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्मच्या मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर झाले. यात  शिवसेनेला नेहमीप्रमाणेच अवजड उद्योग खातेच देण्यात आले आहे. यामुळे शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी सारवासारव केली आहे. उद्वव ठाकरे पंतप्रधानांच्या शपथविधीच्या आदल्या दिवशीच दिल्लीला गेले होते. यावेळी ते रेल्वेमंत्रीपद मागतील तसेच दोन कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रीपदे देतील अशी चर्चा होती. मात्र, ही चर्चा फोल ठरली आहे. 
 
शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांना अनंत गीते यांचेच खाते देण्यात आले आहे. तसेच सार्वजनिक उपक्रम हेही खाते देण्यात आले आहे. यामुळे शिवसेनेच आधीच नाराजी असताना संजय राऊत यांनी सारवासारव करत सार्वजनिक उपक्रम हेही महत्त्वाचे खाते असल्याचे म्हटले आहे. तसेच देशात रोजगार मिळावा, अशी जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती