दुपारी एक पर्यंत शांत रहा शिवसेनेन दिला यांना दम

गुरूवार, 23 मे 2019 (08:47 IST)
लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होतो आहे. याच कारणामुळे आज दुपारी एकपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचे आदेश शिवसेनेकडून प्रवक्त्यांना दिले आहेत. शिवसेना भवनात प्रवक्त्यांची बैठक पार पडली, त्यावेळी निकालाच्या दुपारी एकपर्यंत प्रसिद्धी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका असे शिवसेनेकडून प्रवक्त्यांना सांगण्यात आले आहे. खासदार संजय राऊत यांनी या बैठकीला मार्गदर्शन केले असून, एका मराठी वृत्त वाहिनीने हे वृत्त प्रसारित केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातलं मतदान रविवारी 19 मे रोजी पूर्ण झाले, मग विविध वाहिन्यांचे एक्झिट पोल समोर आले. यातील जवळपास सर्वच पोल्सनी देशात एनडीएचं सरकार येणार सांगितले आहे असा अंदाज व्यक्त केला. याशिवाय राज्यातही शिवसेना-भाजपाला चांगलं यश मिळणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र तरीही शिवसेनेनं एक वाजेपर्यंत आपल्या प्रवक्त्यांना माध्यमांशी न बोलण्याच्या सूचना केल्या आहेत. दुपारपर्यंत जेव्हा मतमोजणीचा कल स्पष्ट होईल तेव्हा पक्ष सांगेल तेव्हा मत व्यक्त करा असे सांगितले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती