मुंबई महानगर प्रदेशासह पुणे, नाशिक, सोलापूर, मालेगाव, सोलापूर, जळगाव, अकोला, अमरावती. औरंगाबाद ही महापालिका क्षेत्र रेड झोन म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. कंटेनमेंट झोनमध्ये फक्त जीवनावश्यक गोष्टींना परवानगी देण्यात येईल.
हे बंद राहणार
ट्रेन, मेट्रो, विमान सेवा, आंतरराज्य रस्ते वाहतूक, शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल, हॉटेल, मॉल, प्रार्थनास्थळे, सलून, स्पा बंदच राहणार
रेड झोनमध्ये टॅक्सी, रिक्षाला, खासगी बांधकाम साईटस, खासगी कार्यालयांना, शेती कामांना परवानगी नाही.
हे सुरु राहणार
कंटेनमेंट झोन वगळता दारु दुकाने, वैद्यकीय दवाखाने, हॉटेलमधून होम डिलिव्हरीला, आरटीओ कार्यालये, टॅक्सी, रिक्षामध्ये चालकासह दोनजण अशी तिघांना परवानगी. तसंच मालवाहतुकीला, खासगी बांधकामसाइटसना, ई-कॉमर्स सेवांना, बँक, वित्तीय सेवा, कुरियर पोस्ट सेवा सुरु राहणार.