कोयना व राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, कृष्णा आणि पंचगंगा नदीला पूर परिस्थिती निर्माण

शुक्रवार, 12 ऑगस्ट 2022 (20:46 IST)
कोल्हापूर, सांगली आणि सातारा भागात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. श्रीक्षेत्र नरसिंहवाडीचे दत्त मंदिरा पूर्ण मंदिर पाण्याखाली गेले आहे. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 
 कोयना व राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून एनडीआरएफ टीम, जिल्हा प्रशासन टीम सज्ज करण्यात आली आहे.
 
कोल्हापूर, सातारा आणि सांगली परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे, त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली. त्यातच राधानगरी आणि कोयना धरण परिसरातही मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्याने धरणातून पाणी विसर्गही चालू आहे. त्यामुळे धरणाखाली येणाऱ्या नद्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पुराच्या पाण्यामुळ नृसिंहवाडीचे पूर्ण मंदिर पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती