रविवारी राज्यातील बहुतांश भागात हलका ते मध्यम पाऊस पडला. तर राज्यातील सर्व घाटांवर मुसळधार पाऊस पडला. सोमवारी घाटांसाठी रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे. तथापि, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात पावसात व्यत्यय येण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासांत राज्यात मध्यम ते हलका पाऊस पडला आहे. प्रामुख्याने कोकण आणि घाटांमध्ये मुसळधार पाऊस पडला.
तसेच राज्यात हा पाऊस शुक्रवार, ११ जुलैपर्यंत सुरू राहील. त्यानंतर पावसात मोठी घट झाली आहे. त्यामुळे जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसात खंड पडण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये पाऊस वाढला की राज्यातील पावसाचा अंदाज बदलेल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने ६ जुलै ते ८ जुलै २०२५ दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात विजांसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे प्रशासनाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे आणि नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच नाशिक जिल्ह्यात पाऊस सुरूच आहे आणि नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहे.