महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश मध्ये रेड अलर्ट, केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

शनिवार, 3 ऑगस्ट 2024 (12:31 IST)
देशाच्या अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. डोंगराळ भागांमध्ये पूर स्थिती निर्माण झाली आहे. या दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज देशाच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. 
 
मध्यप्रदेश, छत्तीसगड, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिजोरम, त्रिपुरा या राज्यांमध्ये मुसळधार वासाचा ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. तसेच केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
 
तसेच राजधानी दिल्लीमध्ये शनिवारी आणि रविवार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. 
 
महाराष्ट्रात पुणे, सातारा, मध्ये रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्ये ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर मध्ये येलो अलर्ट घोषीत करण्यात आला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती