देशात रेड अलर्ट जारी, चार दहशतवादी घुसल्याची चर्चा

शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019 (09:56 IST)
दिल्लीमध्ये चार दहशतवादी घुसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे देशात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह देशात सर्तक राहण्याचा इशारा गुप्तचर यंत्रणेने दिला आहे. 
 
दिल्लीच्या विशेष पथकांना छापा मारला. त्यानंतर ही बाबपुढे आली आहे. विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात  हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात सुरक्षा वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 
 
निवडणुकीनंतर दिवाळी, नाताळचा सण आहे. या पार्श्वभूमीवर घातपाताची शक्यता असल्याने सुरक्षा वाढविण्यात आली आहे. विशेषतः बसस्थानक, रेल्वे स्थानक आणि मेट्रो स्थानकांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

File Photo

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती