सख्या बहिणीचा नवऱ्याच्या खून प्रकरणी सख्या भावांना आजन्म कारावास

शनिवार, 12 नोव्हेंबर 2022 (08:04 IST)
आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून सख्या बहीणीचा व तिच्या नवऱ्याचा चाकूने भोसकून सख्या भावांनी साथीदाराच्या मदतीने निर्घुण खून केला होता. या प्रकरणी सख्या भावांना जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 4 एस. पी. गेंधळी यांनी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली, तर साथीदारास साडे तीन वर्षाची सक्त मजूरी सुनावली. 16 डिसेंबर 2015 रोजी कसबा बावडा येथील गणेश कॉलनीमध्ये रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. सरकारी वकील म्हणून ऍड. विवेक शुक्ल यांनी काम पाहिले.
 
इंद्रजित श्रीकांत कुलकर्णी (वय 23), मेघा इंद्रजित कुलकर्णी (वय 20 दोघेही रा. कसबा बावडा गोळीबार मैदान नजीक गणेश कॉलनी) यांचा खून करण्यात आला होता. तर या प्रकरणी गणेश महेंद्र पाटील (वय 25), जयदिप महेंद्र पाटील (वय 24 दोघेही रा. थेरगांव ता. शाहूवाडी) या दोघांना जन्मठेप तर नितीन रामचंद्र काशीद (वय 27 रा. सरुड ता. शाहूवाडी) साडे तीन वर्ष सक्त मजूरीची शिक्षा सुनावण्यात आली. याबाबतची फिर्याद वंदना प्रभाकर माधव (वय 38 रा. गणेश कॉलनी, कसबा बावडा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली होती.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती