वाचा, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेशाबाबत संजय राऊत यांनी काय सांगितले

सोमवार, 30 नोव्हेंबर 2020 (16:33 IST)
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताला शिवेसना खासदार संजय राऊत यांनी दुजोरा दिला असून उर्मिला मातोंडकर उद्या म्हणजेच बुधवारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. “त्या शिवसैनिकच आहेत. बहुतेक उद्या प्रवेश करतील. त्यांच्यामुळे महिला आघाडी मजबूत होईल,” असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
 
राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये सातत्याने धुसफुस सुरू असतानाच विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी १२ नावांची यादी महाविकास आघाडी सरकारच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपवण्यात आली होती. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार १२ नावांची यादी बंद पाकिटात राज्यपालांना सादर करण्यात आली. यांपैकी एका जागेसाठी शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांचं नाव देण्यात आलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती