मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या खळबळजनक विधानामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या राणे यांच्यावरील या कारवाईच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. त्यातच आता नारायण राणे यांची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. “नारायण राणे यांचं ब्लड प्रेशर जास्त असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे”, असे डॉक्टरांनी सांगितलं आहे.
नारायण राणे यांच्या अटकेनंतर माध्यमांशी बोलताना त्यांची तपासणी करणारे डॉक्टर म्हणाले कि, “नारायण राणेंना रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास आहे. आम्हाला आता त्यांची ब्लड शुगर चेक करता आलेली नाही. परंतु, आम्ही ब्लड प्रेशर चेक केलं असून राणेंचं बीपी वाढलेलं आहे. ब्लड प्रेशर जास्त असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे. रुग्णालयात दाखल करून त्यांची ईसीजी तपासणी आणि पुढील उपचार करणं महत्त्वाचं आहे.”