मुख्यमंत्र्यांविरोधी वक्तव्यामुळे राणेंना अटक, मात्र पंतप्रधानांना मारण्याची भाषा करणाऱ्या पटोलेंवर कारवाई नाही: विरोधी पक्षनेते फडणवीस

मंगळवार, 18 जानेवारी 2022 (21:49 IST)
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या पंतप्रधानांवर वादग्रस्त वक्तव्यावरुन सध्या मोठा राजकीय वाद निर्माण झालाय. ‘मी मोदीला मारू शकतो’, ‘शिवी देऊ शकतो’, असे नाना पटोलेंनी भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे कार्यकर्त्यांशी बोलताना म्हंटले होते.
 
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपाच्या अनेक नेत्यांनी नाना पटोलेंवर तीव्र शब्दात टिका केली आहे. गोव्या दौऱ्यावर असलेले भाजप नेते देवेंद्र फडवणीस यांनी या प्रकरणावरून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित करत म्हणाले आहे की, मुख्यमंत्र्यांविरोधात वक्तव्य केलं म्हणून केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणेंना अटक केली जाते.
 
पण आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि नेते नाना पटोले हे थेट पंतप्रधानांना मारण्याची भाषा करत आहेत, मग त्यांच्याविरोधात पोलीस कारवाई का होत नाहीए? असा सवाल करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केला आहे.
 
तसेच यासंदर्भात पुढे बोलताना फडवणीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची भाषा ज्यांनी केली, त्यांच्यावर काहीच कारवाई नाही आणि या अराजकतेवर कारवाईची मागणी करणार्‍या भाजपाच्या लोकप्रतिनिधी-कार्यकर्त्यांना जागोजागी ताब्यात घेण्याची कार्यवाही.
 
या राज्यात चाललंय तरी काय, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. पोलीस विभाग सिलेक्टिव्ह होतो, त्या राज्याची अधोगती झाल्याशिवाय राहात नाही. मुख्यमंत्र्यांची ही जबाबदारीच आहे की देशाच्या पंतप्रधानांना कोणी जीवे मारण्याची धमकी देत असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे !
 
मुख्यमंत्र्यांचे ते कर्तव्यच आहे, उपकार नाहीत असा टोलाही फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. शारीरिक उंची वाढल्यामुळे बौद्धिक उंची वाढते असे नाही. हे नाना पटोले यांनी दाखवून दिलंय. काँग्रेस नेत्यांच्या मनात मोदींजींबद्दल असूया आहे हे दिसतेय.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती