राम कदम यांच्या विरोधात पोलिस तक्रार घ्या राष्ट्रवादीचे आंदोलन

गुरूवार, 6 सप्टेंबर 2018 (17:20 IST)
राम कदम यांच्या संतापजनक विधानाचा समाचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज घेतला. एवढंच नाही तर राम कदम यांच्या विरोधात घाटकोपर येथील चिरागनगर पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवून घ्यावा म्हणून सुमारे १० तास ठिय्या आंदोलन केले. काही कार्यकर्ते रात्रभर या पोलिस ठाण्यात थांबणार असून जर एफआयआर नोंदवून नाही घेतला तर उद्या दुपारपासून तीव्र आंदोलन छेडले जाईल असं आमदार विद्याताई चव्हाण यांनी पोलिसांना निक्षून सांगितलं. त्याचप्रमाणे महिलांचा अवमान करणाऱ्या या संतापजनक वक्तव्याविरोधात न्यायालयातही दाद मागणार असल्याचा इरादा त्यांनी स्पष्ट केला.
 
या निषेध मोर्चात मुंबई अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, मुंबई युवती अध्यक्षा आदिती नलावडे, मुंबई समन्वयक मनीषा तुपे, जिल्हाध्यक्षा - पुष्पां हरियन, डॉ सुरैना मल्होत्रा, आरती साळवी, बिलकिश शेख, डॉ रीना मोकल, स्वाती माने,मुंबई विद्यार्थी अध्यक्ष अमोल मातेले, अल्पसंख्यानक मुंबई अध्यक्ष सुहेल सुबेदार, अन्वर दळवी, सुरेश भालेराव व असंख्या पदाधिकारी, कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती