राज ठाकरे स्वतःला बाळासाहेब ठाकरे समजू लागले आहेत - उद्धव ठाकरे
रविवार, 1 मे 2022 (10:37 IST)
"राज ठाकरे स्वतःला बाळासाहेब ठाकरे समजू लागले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही भाजपची 'बी' टीम नव्हे तर 'ढ' टीम आहे," अशा शब्दांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे.
शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियान अंतर्गत खासदारांच्या बैठकीत शुक्रवारी ते बोलत होते. यावेळी त्यांनी पक्षाच्या पुढील टप्प्यातील डावपेचांबाबत चर्चा केली.
"मुन्नाभाई चित्रपटात मुन्नाभाईला गांधीजी वाचून वाचून आपणच गांधींसारखे बोलू शकतो असा भ्रम होतो. तसेच हे राज ठाकरे हे आपण जणू बाळासाहेब ठाकरेच आहोत असे समजू लागले आहेत," असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं.