महाराष्ट्रात आणखी दोन ते तीन दिवस उष्णतेची लाट कायम असण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये उष्णतेची लाट असल्याने पुढचे दोन दिवस तरी महाराष्ट्रात तापमानवाढ कायम राहिल असे दिसते.दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात मात्र पावसाळी वातावरण आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारांसह पाऊस पडला आहे. मुबंईत मात्र उकाडा कायम आहे.
विदर्भात आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. येत्या 7, 8 आणि 9 एप्रिल कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. येत्या 10 एप्रिल मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.